वर्गाचावर्गाचा सारांश
संस्कार वर्गाची स्थापना 2012 मधे झाली होती. ह्या वर्गात शिकवल्या जाण्याऱ्या शाळाबाहय गोष्टी बालकांच्या जडण घडवणुकीला आवश्यक असतात. आपले भारतीय रूढी परंपरा शिकवण्यासोबतच मुलांवर संस्कार करण्यावर भर आहे. ह्यामधे प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश होतो.
बालकांची दिनचर्या.
मोठ्यांविषयी आदर.
शिक्षणाचे, घरच्या अभ्यासाचे आणि परिश्रमाचे महत्व.
सकाळी लवकर उठणे आणि स्वावलंबी बनणे.
क्षमाशील आणि कृतज्ञ राहणे, हट्ट कमी करणे, रागावर नियंत्रण आणणे.
भारतीय संस्कृती, परंपरा आणि सणांचे महत्व.
स्तोत्रे, अथर्वशीर्ष, रामरक्षा, भगवदगीता इत्यादीचे पाठांतर.
योगासन, प्राणायाम, गाणे, गोष्टी व खेळ.
बालकांचा आवडी आणि छंदांना प्रोत्साहन देणे आणि मोठे झाल्यावर एक चांगली व्यक्ती होण्यास मदत करणे.
वर्ग हे ऑफलाईन अँड ऑनलाईन दोन्ही माध्यमातून घेतले जातात. जगभरातील सर्व मुलांना ह्यांचा लाभ घेता येतो.